What our Clients Say

Reviews

4.9

Sandhya Shekatkar

Keshav Magar Associates is an exceptional legal firm, distinguished by a team of highly qualified, knowledgeable, and efficient lawyers. Adv. Keshav Magar, the founder, is an outstanding professional with a thorough and up-to-date understanding of the law. He is known for his dynamic personality and unwavering commitment to his clients. In addition to his legal expertise, Adv. Magar is deeply involved in social activities, having earned numerous prestigious awards and accolades for his outstanding contributions to various social causes. Throughout my experience, Adv. Magar has always been available to address my questions and concerns, ensuring I felt comfortable and confident throughout the legal process. The firm’s team is supportive with their expert guidance. I highly recommend Keshav Magar Associates for anyone seeking top-tier legal assistance.

संगीत आडके

5.0

श्री. मगर सरांनी आम्हाला एक विश्वास दिला

2020 मध्ये फॅमिली प्रॉब्लेम मुळे मी खूप अपसेट झाले होते. त्यामुळे माझ्या घटस्फोटाची केस शिवाजीनगर कोर्टामध्ये चालू होती. माझा मुलगा 8 वर्षाचा होता आणि तो माझ्या बरोबर रहात होता. मुलाची जबाबदारी व भविष्याच्या चिंतेने माझे कशातच मन लागत नव्हते. मी नोकरी करत असल्याने नोकरी संभाळून मुलाची जबाबदारी यामुळे मी मानसिक व शारीरीक त्रासाने फारच त्रासून गेले होते. त्यामुळे मी खूप अपसेट झाले होते.
त्यातच महिन्यातून दोन वेळा कोर्टात जावे लागत असे. त्यामध्ये खूप वेळ जात असे, अशातच मला माझ्या नव-याकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नव्हती. जवळपास दोन वर्षे झाली तरी निकाल काही लागत नव्हता. त्याच वेळेस माझ्या वकीलांना काही कारणास्त्व माझी केस पुढे चालवणे शक्य होत नसल्यामुळे त्यांनी माझी केस ADV. श्री. मगर सरांकडे वर्ग केली .
पहिल्या ओळखीमध्ये ADV. श्री. मगर सरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्यामध्ये साधारणतः आम्ही दीड ते दोन तास चर्चा केली . त्याचवेळेस त्यांनी माझ्या मिस्टरांशी दूरध्वनी द्वारे चर्चा करून व नंतर प्रत्यक्ष भेटून आम्हा दोघांना छान पद्धतीने मोटिवेशन केले. आमच्या घटस्फोट घेण्याच्या निर्णयाचा तुमच्या मुलाच्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम होईल त्याचे गांभिर्य समजून सांगितले. सरांनी ज्या पध्दतीचे मोटिवेशन केले किंवा एक सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवला यापध्दतीने यापूर्वी ना कोर्टमध्ये झाले ना इतर कोणी व्यक्तींनी सांगितले. प्रत्येक वेळेस आम्हाला दुस-याचीच चुक वाटायची. चुका कोणाच्या आहेत हे समजत नव्हत ,पण श्री. मगर सरांनी खूप छान पद्धतीने काऊन्सिलिंग केले आपण केस मधून बाहेर पडून मुलाच्या भविष्यासाठी तुम्ही दोघे पुन्हा एकत्र या व सुखी संसार करा कोर्ट कचेरी यामध्ये तुम्ही तुमचे व मुलाचे आयुष्य वाया घालवू नका तेव्हा असं वाटलं की कोणीतरी आहे. मी कलावती आईंची भक्त् असल्याने माझ्या गुरु कलावती आई यांनीच सरांना पाठवले आहे असे वाटले.
त्यानंतर ADV. श्री. मगर सर म्हणाले आता दोघांनी कामाकडे लक्ष दया मुलांना शिकवणे मुलांना त्यांच्या पायावर उभे करणे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. श्री.मगर सरांनी केलेल्या मोटिवेशन व सहकार्याने आम्ही घटस्फोट घेण्यापासून परावृत्त झालो व आज सरांमुळे आम्ही दोघे परत एकत्र आनंदाने नांदत आहे. आमच्या या निर्णयामुळे आमचा मुलगा देखील खुप आनंदी झाल्याचे पहात आहे.
त्यानंतर देखील ADV. श्री. मगर सरांनी आम्हाला एक प्रकारे विश्वास दिला की, भविष्यात तुम्हाला माझ्याकडून कुठेही कसलीही माझी मदत लागली तर मी तुझ्याबरोबर आहे आणि शेवटपर्यंत या बदल्यात ADV. श्री. मगर सरांनी माझ्याकडून कुठल्याही पद्धतीने फि घेतली नाही. उलट जिथे कुठे काही लागत होते तिथे त्यांनी स्वत्: त्यांच्या जवळील रक्क्म खर्च केली.
आजच्या जगात ॲड. मगर सरांसारखे निस्वार्थी वकील आहेत व त्यांचे सहकार्य मला लाभले हे मी माझे भाग्यच समजते.
ADV. श्री. मगर सरांच्या सहकार्याने माझे सध्या खूप चांगले जीवन सुरु आहे. त्यामध्ये ADV. श्री. मगर सर यांचे खूप मोठे योगदान आहे.
सरांना सर्व सुख मिळावे. सरांना माझे शतशः प्रणाम🙏🏻👏🏻

आपली गौरी

4.8

देव तर नाही पाहिला पण देव माणूस नक्की पाहिला ते म्हणजे एडवोकेट मगर सर

मे २०१५ मध्ये माझी फॅमिली प्रॉब्लेम मुळे मी खूप अपसेट झालो होतो. माझ्या घटस्फोटाची केस शिवाजीनगर कोर्टामध्ये व कष्टडीची केस, माझी मुलगी स्वरा या मुलीची कष्टडी ची केस चालू होती. माझी मुलगी दीड वर्षाची होती . ती तिच्या आईकडे राहत होती. त्यामुळे मी खूप अपसेट झालो होतो. मला कुठल्याही बिजनेस मध्ये मन लागत नव्हते. माझा यश कम्प्युटर नावाचा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. त्यामध्ये माझे लक्ष लागत नव्हते. महिन्यातून तीन-चार वेळा कोर्टात जावे लागत असे. त्यामध्ये खूप वेळ जात असे, त्यामध्ये कस्टडीची केस व कोर्टाच्या नियमानुसार एका स्त्रीच्या बाजूने लागते. त्यामुळे मुलीची ताबा मला मिळाला नाही. त्यानंतर मी भरपूर डिप्रेशन मध्ये गेलो . घटस्फोटाची केस चालू होती .ती फार मोठ्या प्रमाणात खूप काळानुसार चालत होती. पाच वर्षे झाली तरी निकाल काही लागत नव्हता. त्याच वेळेस माझे काकांच्या माध्यमातून एडवोकेट केशव मगर सर यांची ओळख झाली .पहिल्या ओळखीमध्ये एडवोकेट सरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्यामध्ये साधारणतः आम्ही दोन तास चर्चा केली . त्या चर्चेमध्ये माझ्या मधला सगळा ताण तणाव सर्व डिप्रेशन बाजूला होऊन मी एक सक्षम व आनंदी बाहेर पडलो. हे छान पद्धतीने मोटिवेशन मला कधीच कोणी केले नव्हते. मला असं वाटत होते की मीच अपराधी आहे. चुकी कोणी केली आणि सजा कोण भोगतोय? ते समजत नव्हत ,पण मगर सरांनी खूप छान पद्धतीने आपण केस मधून बाहेर पडू व कशा पद्धतीने काउन्सलिंग करायचे.हे खूप योग्य पद्धतीने सांगतील तेव्हा असं वाटलं की कोणीतरी आहे. माझ्या गुरु कलावती आई यांनीच सरांना पाठवले आहेत असे वाटले. त्यानंतर एडवोकेट मगर सर म्हणाले अनिल आता कामाकडे लक्ष दे ते खूप महत्त्वाचे आहे जर कामाकडे लक्ष देशील तर बाकीच्या गोष्टीकडे लक्ष जाणार नाही. तुझे करतोयस ते खूप खूप महत्त्वाचे आहे मुलांना शिकवणे मुलांना त्यांच्या पायावर उभे करणे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तडा जाऊ देऊ नकोस, तिथे कुठेही माझी मदत लागली तर मी तुझ्याबरोबर आहे आणि शेवटपर्यंत.
या बदल्यात एडवोकेट मगर सरांनी माझ्याकडून कुठल्याही पद्धतीने रक्कम किंवा एखादी वस्तू घेतली नाही. उलट जिथे कुठे काही लागत असेल तर तेच कॅश देत होते. त्यानंतर एक वर्षाच्या आत माझा म्युचल पद्धतीने घटस्फोट झाला . सर्व व्यवस्थित पद्धतीने माझे चांगले झाले त्यामध्ये एडवोकेट केशव मगर सर यांचे खूप मोठे योगदान आहे.
व त्यानंतर यश कम्प्युटरमध्ये केशवनगर सरांनी खूप पद्धतीने सुधारणा केली . छान छान नवीन नवीन गोष्टी क्लासमध्ये आणल्या व बिजनेस कसा करावा व त्याची व्यवस्थापना कशी करावी हे खूप सोप्या व छान पद्धतीने सांगितले.
मला जर कोण बोलले की तू देव पाहिला आहेस तर, मी बोलेन देव तर नाही पाहिला पण देव माणूस नक्की पाहिला ते म्हणजे एडवोकेट मगर सर
सरांना सर्व सुख मिळावे. सरांना माझे शतशः प्रणाम असेच राहा

आपला अनिल मोरे

4.9

Amol Ajjit Rahatekar

Adv. Keshav Magar Sir is a true leader. He has established his name in the legal field in very short time. His execution skill is result oriented. I wish him goodluck for the entire team

“KESHAV MAGAR ASSOCIATES “

Google and Yelp Reviews From Actual Clients​
Google Reviews Logo

Get a Free Consultation

Scroll to Top